नागपूर : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारचे ४०२ गुन्हे दाखल झाले. त्यात गुन्हेगारांनी लंपास केलेल्या मुद्देमालांपैकी ४०२ गुन्ह्यांची उकल करीत पोलिसांनी दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नागपूर, गोंदिया, इतवारी, वर्धा, बडनेरा आणि अकोला असे सहा रेल्वे पोलिस स्टेशन तसेच भंडारा, नागभिड, अजनी, बल्लारशाह, अमरावती, वाशिम आणि मूर्तिजापूर या सात आउटपोस्टचा समावेश आहे. या एकूण १३ ठिकाणी वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली. रेल्वेचे पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे तसेच वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास केला. महाराष्ट्रासह नक्षलग्रस्त छत्तीसगड व ईतर राज्यात जाऊन रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावला आणि त्यातील गुन्हेगारांकडून सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित तक्रारदारांकडून ओळख पटवून त्यांचा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला.
जानेवारीच्या १७ दिवसांत चोरट्यांनी चोरलेल्या १७ मोबाईल चोरीचा पोलिसांनी छडा लावला. हे सर्व मोबाईल जप्त करण्यात आले. त्यात प्रमाणे गेल्या वर्षीच्या सात मोबाईल चोरीचाही छडा लावून एकूण २४ मोबाईल ज्यांचे त्यांना परत करण्यात आले.
१५० गुन्हेगार जेरबंदरेल्वेत गुन्हे करणाऱ्या १५० सराईत गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १ कोटी, १५ लाख, ५२ हजार, ६३५ रुपयांच्या चिजवस्तू जप्त करण्यात आल्या. तर, गेल्या १७ दिवसांत (१ ते१७ जानेवारी २०२४) २४ गुन्हे उघडकीस आणत रेल्वे पोलिसांनी २ लाख, ५७ हजार, ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.