गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका शाळांतील पटसंख्या वाढावी, शिक्षणाचा दर्जा उंचवावा, यासाठी सभागृहात १०० पटाच्या शाळांना मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजाणी करण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. परंतु शिक्षण विभागाने सभागृहाचा निर्णय व महापौरांचे आदेश धाब्यावर बसवून शाळा समायोजनाचा निर्णय घेतला आहे. यामुळे या तुघलकी निर्णयामुळे मनपाच्या १५ शाळा बंद पडणार असून ७० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी प्रशासकीय सोयीचे कारण देत शाळा समायोजनाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार २५ शाळा १० शाळांत समायोजित केल्या जात आहे. संजयनगर येथे मनपाच्या सहा शाळा आहेत. यातील चार शाळा दोन शाळात समायोजित करण्यात आल्या . विशेष म्हणजे अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत कमी पटसंख्या असलेल्या शाळा समायोजित न करता कमी पटसंख्या असलेल्या शाळेत २१८ पटसंख्या असलेली संजय नगर हिंदी प्राथमिक शाळा-२ समायोजित करण्यात आली आहे. कुंदनलाल गुप्ता नगर येथील चार शाळा एका शाळेत समायोजित करण्यात आल्या. समायोजनात २०० पटाची एक तर १००पटाच्या चार यासह अन्य शाळांचा समावेश आहे.पुन्हा काही शाळा बंद पडणारशहरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळांचा दर्जा उंचावून पट वाढविण्याने नियोजन न करता शाळा समायोजनाचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या १२२ प्राथमिक शाळा आहेत. समायोजनामुळे ही संख्या १०७ पर्यंत खाली आली आहे. भविष्यात पुन्हा काही शाळा बंद पडणार आहेत. अशा परिस्थितीत स्लम भागातील गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.महापौरांचे आदेश धाब्यावरआर.टी.ई. धोरणानुसार मनपा शाळांवर मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी शिक्षण विभागाला दिले होते. सभागृहातही याबाबत निर्णय घेण्यात आला. परंतु हा आदेश धाब्यावर बसवून शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा समायोजनाचे आदेश काढले आहेत.