अपघाताचा परिणाम : नागपूर-भुसावळ रेल्वेगाडी रद्दनागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे कामायनी एक्स्प्रेस आणि जनता एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांचे कोच रुळावरून घसरल्यामुळे मोठा अपघात होऊन मुंबई-ईटारसी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान नागपुरातून गुरुवारी सकाळी ७.२० वाजता सुटणारी नागपूर-भुसावळ ही इटारसी मार्गे जाणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई-इटारसी या मार्गावरील नागपुरात न येणाऱ्या १५ गाड्या नागपूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत.मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या अपघातामुळे मुंबई-ईटारसी मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्याचा तर काही गाड्यांचे मार्ग बदलविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १५ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)नागपूरमार्गे वळविलेल्या गाड्या भुसावळ-नागपूर-इटारसीमार्गे१२३२२ मुंबई-हावडा कोलकाता मेल११०१५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस१२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस-राजेंद्रनगर टर्मिनस एक्स्प्रेस११०५७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-अमृतसर एक्स्प्रेस११०९३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-वाराणशी महानगरी एक्स्प्रेस११०७८ जम्मुतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस१२१४९ पुणे-पटना एक्स्प्रेसइटारसी-नागपूर-भुसावळ मार्गे १२१४२ राजेंद्रनगर टर्मिनस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस११०९४ वाराणशी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस११०५६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्स्प्रेस१५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस१२२९४ अलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस१२३३५ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस१९०४६ छापरा-सुरत ताप्ती गंगा एक्स्प्रेस१२३२१ हावडा-मुंबई मेल
१५ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे वळविल्या
By admin | Published: August 06, 2015 2:54 AM