नागपूर - जैन कलार समाज नागपूर यांच्यावतीने रेशीमबाग येथील जैन कलार समाजभवनमध्ये नुकताच विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या १५ महिलांना स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नारायणा ग्रुपच्या संचालिका विलासिनी नायर तसेच. माजी प्राचार्य आणि जी एच रायसोनी,ग्लोबल पुरस्कार २०२३ च्या मानकरी असलेल्या डॉ. वीणा कावळे उपस्थित होत्या.लोकमतसखी डॉट कॉम या सोहळ्याचे डिजिटल मीडिया पार्टनर होते.
या सोहळ्यात मालुताई क्षीरसागर, निलुताई तिडके, कल्पनाताई मनपुरे, उषाताई तिडके, डॉ.राखीताई खेडीकर, माधुरी सोनवणे, वृषाली क्षीरसागर, वंदना समर्थ, कोमल टपाले, कमला पलांदुरकर, टिना खोब्रागडे, अरूणा गुनारकर, प्रज्ञा बनसोड, ऋतुजा दुरुगकर, स्नेहा बनसोड यांना स्वयंसिद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
अभिव्यक्ती आणि रंगारंग २०२३ च्या अंतर्गत या सोहळ्यात विविध रंगारंग कार्यक्रमांचेही आयोजनही करण्यात आले होते. महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न मंजुषा, स्वरसांज गायन स्पर्धा,कचऱ्यातून कला,नृत्यांजली,फॅशन शो यासारख्या स्पर्धा घेऊन बक्षीसं देण्यात आली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ.संगीता बानाईत, वेदश्री मंडवगणे, मयुरी पाटणे, असमा उपरे, सुरभी शिरपुरकर उपस्थित होत्या. परस्परांना भेटत, प्रेरणा घेत, स्नेहभोजन करत हा सोहळा संपन्न झाला.