लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या १५० बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाच्या अँटी हॉकर टीम ब चे उपनिरीक्षक के. सी. जाटोलिया, प्रधान आरक्षक एन. पी. वासनिक, जवान शैलेश भास्कर, राजू खोब्रागडे, श्याम झाडोकर, नविनकुमार हे रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये तपासणी केली असता त्यांना एस ४ कोचमध्ये शौचालयात एक बेवारस बॅग आढळली. कोचमधील प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता कुणीच बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या बॉटल आढळल्या. बॅग आरपीएफच्या ठाण्यात आणून उपनिरीक्षक दिलीप सिंह यांच्यासमोर सादर केली. बॅगमध्ये दारूच्या ९७५० रुपये किमतीच्या १५० बॉटल होत्या. निरीक्षक रवि जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूच्या १५० बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 9:53 PM
रेल्वे सुरक्षा दलाने संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या १५० बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द केल्या आहेत.
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : शौचालयात आढळली बेवारस बॅग