लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरुवारी महापालिकेच्या १२ बसमधून या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी नेण्यात आले. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या १० चमू कामाला लावण्यात आल्या होत्या.नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतिनगर, लालगंज, राजीवनगर व गौतमनगर आदी भागात २२ डॉक्टरांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या ३१३ चमूंच्या माध्यमातून २४ हजार ५५९ घरातील १ लाख ६ हजार ९०९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच लक्ष्मीनगर, मंगळवारी व धंतोली झोन क्षेत्रातील अभ्यंकरनगर, खामला, जरीपटका , एम्प्रेस सिटी या भागात १८ डॉक्टरांच्या नेतृत्वात २२५ चमूंच्या माध्यमातून ३० हजार ५१७ घरातील १ लाख १९ हजार ४०४ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.अशाप्रकारे हॉटस्पॉट व बाधित रुग्ण आढळून आलेल्या भागात ४० डॉक्टरांच्या नेतृत्वात ५३८ चमूंच्या माध्यमातून ५५ हजार ७६ कुटुंबातील २ लाख २६ हजार ३०७ लोकांचा सर्वे करण्यात आला आहे. ३२५ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले.या वस्त्यांमध्ये झाले सर्वेक्षणमोमीनपुरा, सतरंजीपुरा, शांतिनगर, लालगंज, राजीव नगर, गौतमनगर, अभ्यंकरनगर, बजाजनगर,जरीपटका व एम्प्रेस सिटी.असे झाले सर्वेक्षणडॉक्टर : ४०चमू : ५३८घरांची संख्या : ५५ हजार ७६नागरिकांची संख्या : २ लाख २६ हजार ३०७
नागपूरच्या सतरंजीपुऱ्यातील १५० लोकांना केले क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:31 PM
कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देसर्वांची आरोग्य तपासणी करणारहॉटस्पॉट ठरलेल्या भागात ३१३ चमूंच्या माध्यमातून सर्वेक्षण२४ हजार ५५९ घरातील १ लाख ६ हजार ९०९ लोकांची माहिती घेतली