लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘कीर्ती' उपक्रम अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत व्हॉलीबॉल खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी शुक्रवारी सकाळी घेण्यात आली. विद्यापीठाच्या रविनगरातील क्रीडांगणावर खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून आयोजित असलेल्या निवड चाचणीसाठी चौथ्या दिवशी दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. विविध परिसरातील १५५ व्हॉलीबॉल पटूंनी निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला. यामध्ये ९३ मुले तर ६२ मुलींचा समावेश होता.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून कीर्ती उपक्रम अंतर्गत चौथ्या दिवशी व्हॉलीबॉल या खेळातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यासाठी शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी घेण्यात आली. व्हॉलीबॉल करिता १२ वर्ष वया खालील ६ मुले, २ मुली, १५ वर्ष वयाखालील ३५ मुले, ४७ मुली, १८ वर्ष वयाखालील ५२ मुले व १३ मुली असे ९३ मुले व ६२ मुली एकूण १५५ खेळाडूंनी निवड चाचणी दिली. या चाचणीकरिता नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, छिंदवाडा, बालाघाट, भोपाल (मध्य प्रदेश) आदी शहरातील विद्यार्थी सहभागी झाले होते.-आज फुटबॉल चाचणीफुटबॉल (मुले-मुली) या खेळ प्रकाराकरीता शनिवारी सकाळी ६ वाजता निवड चाचणीस प्रारंभ होणार आहे. यापूर्वी खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी होणार आहे.
व्हॉलीबॉल खेळासाठी १५५ खेळाडूंनी दिली चाचणी; कीर्ती' उपक्रम अंतर्गत क्रीडा चाचणी
By आनंद डेकाटे | Published: April 26, 2024 7:14 PM