शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

१५७ लोकसंख्येच्या गावात १५०० पशुधन

By admin | Published: October 26, 2014 12:13 AM

सोयाबीन व मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला उमरेड तालुका आता दूध उत्पादनातही नावारूपास येत आहे. तालुक्यातील डोंगरगावची लोकसंख्या ही १५७ असली तरी येथील पशुधनाची संख्या मात्र १५०० आहे.

डोंगरगावने ठेवला आदर्श : रोज ३००० लिटर दुधाची विक्रीअशोक ठाकरे - उमरेडसोयाबीन व मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला उमरेड तालुका आता दूध उत्पादनातही नावारूपास येत आहे. तालुक्यातील डोंगरगावची लोकसंख्या ही १५७ असली तरी येथील पशुधनाची संख्या मात्र १५०० आहे. त्यामुळे या डोंगरगावात रोज तीन हजार लिटर दुधाचे उत्पादन केले जाते. विशेष म्हणजे, या गावात गवळी समाजबांधवांची संख्या बरीच मोठी आहे. उमरेड तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ‘आलागोंदी’ हे गाव! सन १९५० मध्ये लागलेल्या वणव्यामुळे आलागोंदी हे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पुढे येथील नागरिकांनी परिस्थितीशी संघर्ष करीत शेजारी नवे गाव वसविले, ते म्हणजे, डोंगरगाव! आज या गावाची लोकसंख्या ही १५७ एवढी आहे. डोंगरगावात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गवळी समाजबांधव वास्तव्याला असल्याने तसेच गोपालन हा त्यांचा परंपगरागत व्यवसाय असल्याने या गावातील पशुधनाची संख्या ही १५०० च्या वर आहे. येथे गुरे बांधण्यासाठी एकही गोठा बघावयास मिळत नाही. प्रत्येकाच्या घरासमोर ‘वाडगा’ (कुंपण असलेली गुरे बांधण्याची जागा) आहे. या वाडग्यातच गुरे मोकळी सोडली जातात. तिन्ही ऋतुत उन्ह, वारा, पाऊस, थंडी सहन करीत ही जनावरे याच वाडग्यात राहतात. गुरे बांधण्यासाठी गोठ्याची पद्धती येथील ग्रामस्थांनी अद्यापही अवलंबिली नाही.येथे राज तीन हजार लिटर दुधाचे उत्पादन होत असून, या दुधाची विक्री शहरातील हॉटेल व खासगी दूध डेअरीला करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक दूध उत्पादक धनराज काकडे यांनी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावाची कायम उपेक्षा केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने येथील ग्रामस्थ परंपरागत पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. येथे शालांत परीक्षेपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी आहे. शिक्षणातील मुलींचे प्रमाण नगण्य आहे. येथील एकाही तरुणाला शासकीय नोकरी मिळालेली नाही. दहावी उत्तीर्ण असलेला अपंग गिरीश हा पानटपरी चालवून उदरनिर्वाह करतो. अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी संबंधित अधिकाऱ्याने आपल्याला पाच हजार रुपयांनी मागणी केल्याची व्यथाही त्याने व्यक्त केली. उमरेड-लोहारा-बेला मार्गावरील डोंगरगाव विकासापासून कोसो दूर आहे. येथे एकमेव सिमेंट रोड असून एकाही नालीचे सिमेंटने बांधकाम करण्यात आले नाही. या गावाचा समावेश खुर्सापार (उमरेड) या गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता.