लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ६,४४२ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन १५,८०,००० रुपयाचा दंड वसूल केला आहे.नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इत्यादी सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्कशिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल ५०० दंड आकारण्यात येत आहे.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३९, धरमपेठ झोन अंतर्गत ४१, हनुमाननगर झोन अंतर्गत २४, धंतोली झोन अंतर्गत ४२, नेहरुनगर झोन अंतर्गत १६, गांधीबाग झोन अंतर्गत २०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २७, लकडगंज झोन अंतर्गत ११, आशीनगर झोन अंतर्गत २६, मंगळवारी झोन अंतर्गत १०५ आणि मनपा मुख्यालयात २ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.अशी झाली झोननिहाय कारवाईलक्ष्मीनगर ६६७धरमपेठ १२८९हनुमाननगर ५८८धंतोली ७१४नेहरुनगर ३९५गांधीबाग ४११सतरंजीपुरा ४००लकडगंज ३७७आशीनगर ६७५मंगळवारी ८७८मनपा मुख्यालय ४८
नागपुरात मास्क न लावणाऱ्यांकडून १५.८० लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 9:58 PM
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
ठळक मुद्दे पुन्हा ३५३ नागरिकांवर कारवाई : अकरा दिवसात ६,४४२ विरुद्ध कारवाई