लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुध्द कारवाई केली. ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३१३६१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ४० लाख ३९ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३०, धरमपेठ २८, हनुमाननगर २५, धंतोली ३, नेहरुनगर ९, गांधीबाग ७, सतरंजीपूरा ४, लकडगंज १०, आशीनगर २०, मंगळवारी १९ आणि मनपा मुख्यालयातील ४ जणांविरुध्द ही कारवाई केली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत २५८९१ बेजबाबदार नागरिकांकडून १ कोटी २९ लाख ४५ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.