शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

नागपूर शहरात आणखी १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 12:21 PM

नागपूर महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.

ठळक मुद्दे चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपाचा महत्वपूर्ण निर्णयआता ५० केंद्र नागरिकांच्या सेवेत

नागपूर : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि रोजचा मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या सर्व ५० चाचणी केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये काही ठिकाणी ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटीजेन’ चाचणी केली जात आहे. ‘अँटीजेन’ चाचणीचा अहवाल ३० मिनिटांमध्ये माहित होतो. मात्र ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल येण्यासाठी कालावधी लागतो. ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठीही मनपाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

शहरात सध्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची ६ केंद्र असून लवकरच या केंद्रांचीही संख्या वाढविली जाणार आहे. सध्या नागपूर शहरात दररोज साधारणत: ४००० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या वाढवून दररोज ५ हजार चाचण्या करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची लोक प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढविण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.कोरोना चाचणी पॉझीटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर ०७१२ - २५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करावा. कोरोना संदर्भातील इतर मार्गदर्शनासाठी ०७१२-२५५१८६६, ०७१२-२५३२४७४, टोल फ्री नं. १८००२३३३७६४ या क्रमांकावर संपर्क करावे.- झोन निहाय नवीन कोरोना चाचणी केंद्रआरटीपीसीआर चाचणी केंद्रलक्ष्मीनगर झोन अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस)धरमपेठ झोन अंतर्गत लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृहआसीनगर झोन अंतर्गत पाचपावली पोलीस वसाहतमंगळवारी झोन अंतर्गर प्रभाग क्रमांक १० राजनगरअँटीजन चाचणी केंद्रलक्ष्मीनगर झोन : जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रधरमपेठ झोन : के.टी.नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय, डिक दवाखाना आणि बुटी दवाखाना.हनुमाननगर : हुडकेश्वर आणि नरसाळा प्राथमिक आरोग्य केदं्र , मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रधंतोली झोन : कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन दवाखाना, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रनेहरूनगर झोन : नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघोरी हेल्थपोस्ट, बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठा ताजबागगांधीबाग : मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आमि नेताजी दवाखाना, डाग्नेटिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, दाजी दवाखाना.सतरंजीपुरा झोन : मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिनाको फिमेल दवाखाना, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरंजीपुरा दवाखाना.लकडगंज झोन : चकोले दवाखाना, डिप्टी सिंग्नल आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह प्राथमिक आरोग्य केंद्रआशीनगर झोन : कपिलनगर आणि शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, गरीब नवाजनगर, कुंदनलाल गुप्तानगर, बंदे नवाजनगरमंगळवारी झोन : नारा प्राथमिक आरोग्य कें द्र आणि जरीपटका दवाखाना, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी आणि गोरोवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, सदर रोगनिदान केंद्र.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस