लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात आज १२ रुग्णांची नोंद झाली, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या ३२२ झाली आहे. नागपुरात मेयोच्या प्रयोगशाळेत ५५ वर्षीय तर मेडिकलच्या प्रयोगशाळेत २४ वर्षीय पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १३८ झाली आहे. यातील ४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तीन मृतांची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात एकाच दिवशी १२ रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ४० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, एका मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या २८ रुग्ण उपचार घेत असून चार रुग्ण बरे झाले आहेत. अकोला जिल्ह्यात आज एकाही रुग्णाची नोंद नाही. येथील रुग्णांची संख्या २७ असून यातील आज पुन्हा दोन रुग्ण बरे होऊन रुग्णालातून घरी गेले. बुलडाणा जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया व वाशिम जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे.
विदर्भात १६ नवे रुग्ण; रुग्णसंख्या ३२२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 7:35 PM
विदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात आज १२ रुग्णांची नोंद झाली, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या ३२२ झाली आहे.
ठळक मुद्देअमरावतीत १२, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण