नागपूर : मागील ४ दिवसात जिल्ह्यात प्रतिदिन कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० पेक्षा अधिक येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृतांची संख्याही दोन अंकी कायम आहे. शनिवारी १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तसेच ३६३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
कोरोनाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९३.२१ टक्के इतके आहे. परंतु गेल्या चाार दिवसात बरे होणाऱ्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी आढळून आलेल्या ३६३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५३ ग्रामीण भाागातील तर ३०५ शहरातील ५३ आणि ५ जिल्ह्याबाहेरचे आहेत. १६ मृतांमध्ये ६ ग्रामीणचे, ५ शहरातील व ५ जिल्ह्याबाहेरचे आहेत.
शनिवारी ६८५१ जणांनी कोरोनाची चाचणी केली. यात २२०० ग्रामीण आणि ४६५१ शहरातील आहेत. शनिवारी २०८ रुग्ण बरे झाले. यात ६३ ग्रामीण व १४५ शहरातील आहेत. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ३५८६ झाली आहे. एकूण पॉझिटिव्ह १ लाख ८ हजार ३६३ तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ०१ हजार ००९ इतकी आहे. सध्या ३७६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.