लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोना रुग्णांसोबतच मृतांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आाहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे, अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केल्या जात आहेत. त्यानंतरही अनेक जण मास्क वापरत नाहीत. अशा मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध महापालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमध्ये कारवाई करत आहे. मंगळवारी १६४ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील १२ दिवसात शोध पथकांनी ५,६३४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ११ लाख ७६ हजारांचा दंड वसूल केला आहे.मंगळवारला लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २०, धरमपेठ ३५, हनुमाननगर १७, धंतोली ७, नेहरूनगर १९, गांधीबाग १६, सतरंजीपुरा १०, लकडगंज १६, आशीनगर ५, मंगळवारी झोन अंतर्गत १८ आणि मनपा मुख्यालयात १ जणाविरुद्ध कारवाई करण्यात आली.झोननिहाय १२ दिवसात कारवाईलक्ष्मीनगर - ५७५धरमपेठ - १,१६६हनुमाननगर - ५२४धंतोली -६३८नेहरूनगर - ३३८गांधीबाग -३५५सतरंजीपूरा - ३४५लकडगंज - ३३९आशीनगर - ६२३मंगळवारी - ६८९मनपा मुख्यालय - ४२
नागपुरात मास्क न लावणाऱ्या १६४ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:24 PM
शहरात कोरोना रुग्णांसोबतच मृतांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आाहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे, अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केल्या जात आहेत.
ठळक मुद्दे१२ दिवसात ५,६३४ विरुद्ध कारवाई : ११.८६ लाखाचा दंड वसूल