नागपूर : लक्ष्मीपुजनाला शहरभर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली. या फटाक्यांच्या फटका नागपूरकांना चांगलाच बसला. कारण शहरात १७ ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली. अग्निशमन विभागाला रात्री ८.३० वाजता आगीचा पहिला कॉल आला. तर सतराव्या आगीचा कॉल सकाळी ६.३५ वाजता आला. याचा अर्थ रात्रभर शहरात आगीचे तांडव सुरू होते. कुणाच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि झाडालाही आगी लागल्या. आगीमुळे लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर या आगी विझविण्यासाठी रात्रभर अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
एकाच रात्री एवढ्या आगी लागणे ही गंभीर बाब नागपूरकरांसाठी आणि फटाके उडविणाऱ्यांसाठी देखील आहे. सुदैवाने यात कुठलीही मोठी आग नसल्याने जीवित हाणी झाली नाही. पण या आगींना विझविण्यासाठी अग्निशमन विभागाची चांगलीच पळापळी झाली. लकडगंज भागात ४ ठिकाणी आगीच्या घटना घडला. त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राकडे आग लागल्याचे तीन कॉल आले. तर सिव्हील लाईन्स भागातही ३ ठिकाणी आगी लागल्या. आग विझविण्यासाठी रात्रभर अग्निशमन वाहनांचे सायरन शहरभर वाजत राहिले.
- येथे लागल्या आगी
- पहिली घटना रात्री ८.३५ वाजताची गणेशपेठ साखरे गुरुजी शाळेजवळची आहे. मुकेश झोपाटे यांच्या घराला आग लागली. यात त्यांचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. कॉटनमार्केट अग्निशमन केंद्रातून २ गाड्यांनी आग विझविली.
- दुसरी घटना ८.४२ ची ममता हाऊसिंग सोसायटी सोनेगाव येथील मनोजकुमार जैस्वाल यांच्या घराला आग लागून २५ हजाराचे नुकसान झाले. त्रिमुर्तिनगर अग्निशमनची गाडी तेथे गेली होती.
- तिसरी घटना ८.४५ वाजता दंडीगे लेआऊट येथील आहे. तिथे झाडाला आग लागली होती.
- चवथी घटना ८.५० वाजताची दक्षिणामूर्ती चौकातील घराला आग लागली.
- पाचवा कॉल रात्री ९.०५ वाजताचा बोले पेट्रोप पंपाजवळील म्हाडा कॉम्पलेक्सजवळ आग लागली.
- सहावा कॉल रात्री ९.२० वाजताचा वैशालीनगरच्या मनपाच्या स्कूल ग्राऊंडमध्ये कचऱ्याला आग लागली.
- सातवा कॉल १०.०३ वाजताचा केंद्रीय विद्यालय शाळा झेंडा चौक येथे आग लागली.
- आठवा कॉल १०.१२ वाजता पिवळी नदी परिसरातील कचरा घराला आग लागली.
- नववा कॉल १०.२२ वाजताचा हसनबाग येथील गॅरेजला आग लागली.
- दहावा कॉल १०.२६ वाजताचा मानेवाडा चौक परिसरात झाडाला आग लागली.
- अकरावा कॉल १०.३५ वाजताचा गांधीनगर येथील एनआयटी कॉम्पलेक्समध्ये ५ व्या माळ्यावर आग लागली.
- बारावा कॉल ११.२३ वाजता फुटाळा तलाव परिसरातील वायुसेना रोडवर कचऱ्याला आग लागली.
- तेरावा कॉल ११. २९ वाजता कच्चीविसा भवन बिल्डींगमध्ये आग लागली.
- चौदावा कॉल ११.३२ वाजताचा मध्यवर्ती कारागृहापुढील रुममध्ये आग लागली.
- पंधरावा कॉल पहाटे ५.२० वाजता हनुमानगर चौकोनी मैदानात आग लागली.
- सोळावा कॉल सकाळी ६.२८ वाजता अंबाझरी सुभाषनगर रोडवरील झाडाला आग लागली.
- सतरावा कॉल सकाळी ६.३५ वाजताचा अनाज बाजार इतवारी येथे घराला आग लागली.
दिवाळीच्या दिवशी आगीच्या घटना दरवर्षी वाढतात. फटाक्यांमध्ये ह्या आगी लागल्या असेल. दिवाळीच्या काळात आम्हाला चौकस रहावे लागले. सुदैवाने कुठलीही मोठी आग नव्हती.
- बी. चंदनखेडे, अग्निशमन अधिकारी, मनपा