नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी ६६ व्या रेल्वे सप्ताहानिमित्त नागपूर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी १७ शिल्ड देऊन सन्मानित केले.
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागात १८ ते २४ जून दरम्यान आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी, महिला समाज सेवा समितीच्या अध्यक्ष इंदिरा बॅनर्जी तसेच तिन्ही विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात विद्युत विभाग, अभियांत्रिकी विभाग, लेखा विभाग, संरक्षा विभाग आणि नागपूर विभागाला दक्षता शिल्ड प्रदान करण्यात आले. तसेच तुमसर रोड रेल्वेस्थानकास बेस्ट रेल्वेस्टेशन, वाणिज्य विभागाला बेस्ट बिझनेस डेव्हलपमेंट युनिट, अभियांत्रिकी विभागाला बेस्ट मेन्टेन्ड ब्रिज युनिट, मोतिबागला बेस्ट वर्कशॉप, परिचालन विभागाला कोचिंग ऑपरेशनल शिल्ड, इतवारीला बेस्ट आरपीएफ पोस्ट शिल्ड, गोंदियाला बेस्ट सिग्नलिंग डेपो, राजभाषा विभागाला राजभाषा शिल्ड, डोंगरगडला बेस्ट क्रु बुकिंग पॉईंट शिल्ड, नागपूर विभागाला बेस्ट आयटी शिल्ड, नैनपूरला बेस्ट दक्षता शिल्ड आणि नागपूरच्या सिग्नल अँड इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाला बेस्ट दक्षता शिल्ड प्रदान करण्यात आले. अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिक असल्यामुळे दपूम रेल्वे प्रगतिपथावर वाटचाल करीत असल्याचे मत महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
...............