शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

खळबळजनक! १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांच्या टोळीचा सामुहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 10:00 PM

Nagpur News अंबाझरी परिसरातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांच्या टोळीने तिच्यावर सलग दोन दिवस सामुहिक बलात्कार केला. ही संतापजनक घटना तब्बल आठ दिवसांनंतर उघड झाली.

ठळक मुद्देबलात्कार करण्यापूर्वी दारू आणि एमडी पाजली आठ दिवसांनंतर अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखलपोलिसांकडून आरोपींची शोधाशोध

नागपूर : अंबाझरी परिसरातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांच्या टोळीने तिच्यावर सलग दोन दिवस सामुहिक बलात्कार केला. ही संतापजनक घटना तब्बल आठ दिवसांनंतर उघड झाली. त्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली.

अत्याचारग्रस्त मुलीने दहावीची परिक्षा दिली आहे. दोन वर्षांपूर्वी फैजान खान नामक गुन्हेगारासोबत तिची फेसबूकवरून मैत्री झाली होती. प्रारंभी ऑनलाईन चॅटिंग अन् नंतर प्रत्यक्ष भेटीगाठी वाढल्यामुळे मुलगी फैजानसोबत बिनधास्त फिरायला जाऊ लागली. आरोपी फैजान हा गुन्हेगारी वृत्तीचा असून तो कुख्यात शेख साजिद, अमिन हुसेन, ताैसिफ तसेच नुमान नामक आरोपीसोबत राहतो. हे सर्व गुन्हेगारी वृत्तीचे असून प्राणघातक हल्ले, हाणामारी, चिडीमारी, अंमली पदार्थाची तस्करी आणि विक्री तसेच ठगबाजी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी आहेत. मुलींना प्रेमपाशात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण करण्यातही आरोपी सक्रीय असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर, फैजानने २ फेब्रुवारीला या प्रकरणातील मुलीला फोन करून भेटण्यासाठी बोलवले. तिने होकार देताच अमरावती मार्गावर त्याने ताैसिफला तिला घ्यायला पाठविले. त्याच्यासोबत ती मानकापुरातील शेख सादिकच्या फ्लॅटवर पोहचली. तेथे फैजानचे अन्य साथीदारही होते. आधी दारू आणि नंतर एमडी प्यायला दिल्यावर फैजानने तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याच्या चार मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, रात्री जेवण केल्यानंतर मुलीने तिच्या पालकांना फोन करून मैत्रीणीच्या रूमवर असल्याची थाप मारत रात्री घरी परतणार नाही, असेही सांगितले. यानंतर आरोपींनी तिच्यावर पुन्हा बलात्कार करून सीताबर्डीतील एका होस्टेलवर राहणाऱ्या मैत्रीणीकडे तिला आणले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला तेथून सोबत नेऊन एका फ्लॅटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला ४ फेब्रूवारीला कॅम्पस जवळ सोडून आरोपी निघून गेले. विशेष म्हणजे, तब्बल दोन दिवसांनंतर घरी परतलेल्या या मुलीने गप्प राहणेच पसंत केले.

अखेर झाला उलगडा

दोन दिवसानंतर मुलगी पुन्हा मित्रासोबत फिरायला गेली. दुचाकीचा अपघात झाल्याने तिला मारही लागला. घरी परतल्यानंतर ती अस्वस्थ झाल्याचे पाहून गुरूवारी तिच्या बहिणीने तिला खोदून खोदून विचारले. त्यानंतर तिने फैजान आणि त्याच्या चार मित्रांनी दोन दिवसांत अनेकदा सामुहिक बलात्कार केल्याचे सांगितले. ते कळाल्यानंतर हादरलेल्या घरच्यांनी तिला अंबाझरी ठाण्यात नेले. सामुहिक बलात्काराची तक्रार मिळाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध सुरू केली.

दोघांना अटक, तिघे फरारया प्रकरणाची पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायु्क्त विनिता साहू यांनी तपासावर लक्ष केंद्रीत करून तपासासाठी वेगवेगळी पोलीस पथके कामी लावली. त्यांनी मुख्य आरोपी फैजानसह दोघांना अटक केली. तिघे फरार आहेत. अंबाझरीचे ठाणेदार गजानन कल्याणकर आणि त्यांचे सहकारी तसेच गुन्हे शाखेची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

चंद्रपूर टोळीशी कनेक्ट ।

बहुतांश आरोपी चंद्रपुरात कुख्यात मामू-चाचूच्या टोळीशी कनेक्ट आहेत. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्या प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याची बातमी चर्चेला आली होती. ती माहिती खरी की खोटी त्याची आम्ही शहानिशा करत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी