शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 11:02 AM

प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले.

ठळक मुद्दे ती १७ ची तो २७ चा, दोन वर्षांची प्रेमकथापाच महिन्यांचा गर्भ, सारेच अचंबित

नरेश डोंगरे

नागपूर : गर्भधारणा झाल्यानंतर एका युवतीने युट्यूबवर सर्च करून वेगवेगळे उपाय केले अन् स्वत:च स्वत:चे अबॉर्शन करून घेतले. हा अघोरी प्रकार पाहून पालकांनी तिला तत्काळ नागपुरात उपचारासाठी आणले. तिची प्रकृती आता ठीक आहे. मात्र, या प्रकरणाची तक्रार झाल्याने पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अविवेक आणि अघोरीपणाचा नमुना ठरलेले हे प्रकरण शनिवारी चर्चेला आले.

प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. वर्षभरापूर्वी त्या तरुणाला नागपुरातील एका इस्पितळात रोजगार लागला. त्यामुळे तो इकडे आला आणि एमआयडीसी परिसरात रूम करून राहू लागला. परिणामी, या दोघांची ताटातूट झाली. त्यामुळे विरहाने कासावीस झालेले हे दोघे संधी मिळेल तेव्हा एकमेकांना भेटू लागले. कधी हा नरखेडला जात होता, तर कधी ती नागपुरात येत होती.

सहा महिन्यांपूर्वी ती अशीच एकदा नागपुरात येऊन त्याच्या रूमवर मुक्कामी थांबली. येथे चार दिवसांत त्यांचे अनेकदा शरीरसंबंध आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीपासून तिला मळमळ, उलटीचा त्रास वाढला. गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर ती हादरली. तिने प्रियकराला हा प्रकार सांगितला. तो इस्पितळात काम करत असल्याने त्याने तिला काही औषधे दिली. त्यातील काही तिने खाल्ली. मात्र, उपयोग झाला नसल्याने बाकी औषधे फेकून दिली. त्यानंतर गर्भपात कसा करायचा, त्याची माहिती मिळवण्यासाठी तिने यू ट्यूबवर क्लास घेणे सुरू केले. तासन्तासाच्या सर्चिंगनंतर तिला काही गावठी औषधांची माहिती मिळाली. त्याचा तिने काढा तयार करून तो घेतला. त्यामुळे तिचा चार दिवसांपूर्वी घरीच गर्भपात झाला.

पाच महिन्यांचे अर्भक अन्

मुलगी सुस्त पडल्याचे पाहून आईने इकडे-तिकडे पाहणी केली असता पाच महिन्यांचे अर्भक खाली पडलेले दिसले. ते तसेच मुलीला उचलून पालकांनी मेडिकल इस्पितळात आणले. अर्भक मृतावस्थेत होते. डॉक्टरांनी मुलीवर उपचार केले. तिची प्रकृती आता ठीक आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यांनी पोक्सो कायद्यानुसार मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे

मुलीसोबत शरीरसंबंध नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रस्थापित झाले अर्थात गुन्ह्याची सुरुवात इकडून झाल्यामुळे हे प्रकरण ग्रामीण पोलिसांनी एमआयडीसीकडे शनिवारी वर्ग केले. एमआयडीसी पोलीस आता आरोपी प्रियकराचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपातPOCSO Actपॉक्सो कायदाpregnant womanगर्भवती महिला