शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

१.७४ कोटींच्या फसवणुकीचा तपास संथगतीने

By admin | Published: June 09, 2017 2:37 AM

हनुमाननगर शाखेच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील १ कोटी ७४ लाखांच्या बनावट वाहन कर्जप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सहा महिन्याचा काळ उलटला.

बनावट वाहन कर्ज प्रकरण े रॅकेटमधील १७ पैकी दोघांनाच अटक े सूत्रधाराचा जामीन फेटाळलाराहुल अवसरे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हनुमाननगर शाखेच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील १ कोटी ७४ लाखांच्या बनावट वाहन कर्जप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सहा महिन्याचा काळ उलटला. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास कासवगतीने सुरू आहे. १७ जणांचे रॅकेट या गुन्ह्यात सहभागी असताना आतापर्यंत केवळ दोघांनाच अटक करण्यात आलेली आहे. या बनावटगिरीचा मुख्य सूत्रधार दर्शन कॉलनी येथील रहिवासी भूषण नंदकिशोर चरडे याचा गुरुवारी नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावताच पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले. बनावट वाहन कर्ज प्रकरण २४ सप्टेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१६ या काळात घडले. बँकेचे शाखा व्यवस्थापक देवराव उरकुडा मोहंदेकर यांच्या तक्रारीवरून २८ जानेवारी २०१७ रोजी भादंविच्या ४०६,४६५, ४६७, ४६८,४७१,४७२, ४७३,४७४,४२०,३४,१२०(ब) कलमान्वये १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी मोहम्मद जावेद शेख मोहम्मद अब्दुल शेख (३३) रा. चिखली कळमना आणि भूषण चरडे हे दोघे २८ जानेवारीपासून अटकेत आहेत. शेख इस्माईल शेख गुलाब, राज श्यामलाल आडे, मोहम्मद अब्दुल रशीद शेख, राजेश प्रभाकरन नायर, गोपाल रामप्रसाद अग्रवाल, अनिस खाँ मेहबूबखाँ पठाण, ताहीर शेख छोटेसाहेब रसूल शेख, रवींद्र विश्वनाथ पोटदुखे, विवेक शरद दिवाण, मुजीब वहीद खानशाहीद अहमद खान जीमल अहमद खान, सलीम जुम्मन शेख, स्वप्निल विष्णू भुजाडे, रेहाना इस्माईल शेख आणि राहुल अनिल मेश्राम, असे १५ आरोपी अद्यापही फरार आहेत. या रॅकेटने चारचाकी वाहन कर्ज प्राप्त करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. इंडियन ओव्हरसीज बँकेत कर्ज प्रस्ताव सादर करून तो मंजूर केला होता. सेंट्रल प्रोव्हिन्स मोटर्स, थापर सन्स मोटर्स आणि स्टार मोटर्स या नामांकित वाहन वितरक कंपन्यांमधून वाहने खरेदी केल्याचे बनावट इन्व्हाईस तयार करून ते बँकेत सादर केले होते. कर्ज रकमेचे डिमांड ड्राफ्ट आरोपींनी स्वत:च प्राप्त केले होते. विविध बँकांमध्ये या वाहन वितरक कंपन्यांच्या नावे बनावट खाते उघडले होते. या खात्यांमध्ये डीडी जमा करून रकमा आपापल्या खात्यात वळवल्या होत्या. या टोळीने एकूण १६ वाहनांसाठी १ कोटी ७४ लाखांचे कर्ज घेऊन बँकेची मोठी फसवणूक केली.