जिल्हास्तरीय समितीची पाचवी बैठक : जिल्हाधिकारी सचिन कुर्वेनागपूर : शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या निर्णयानुसार नागपूर जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. शुकवारी जिल्हास्तरीय समितीची पाचवी बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) भिवापूर, सावनेर, कुही, पारशिवनी, मौदा, नरखेड, उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा या अकरा तालुक्यातील १७५६ शेतकऱ्यांचे २ कोटी ९२ लाख १९ हजार रुपयांचे सावकारी कर्ज माफ करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बैठकीनंतर दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीस जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रतिनिधी रतनसिंह यादव, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी डी.स. पारसे, सहायक निबंधक टी.एन. चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, प्रकाश भजनी, अंजुषा गराटे, संजना आगरकर, आर.एन.वसू, शितलकुमार यादव, सचिन गोसावी, बाळासाहेब टेरे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकरांकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तालुकानिहाय प्रकरणे अशी - नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे ६ लाख २६ हजार २८८ रुपये, हिंगणा तालुक्यातील ७ शेतकऱ्यांचे ३६ हजार १६५ रुपये, भिवापूर तालुक्यातील १३३ शेतकऱ्यांचे २१ लाख ८६ हजार २६८ रुपये, रामटेक तालुक्यातील १०३ शेतकऱ्यांचे २५ लाख २५ हजार ८८० रुपये, सावनेर तालुक्यातील ४० शेतकऱ्यांचे ६ लाख ५३ हजार ९०६ रुपये, उमरेड तालुक्यातील ४५४ शेतकऱ्यांचे ८९ लाख ८० हजार ४९० रुपये, कुही तालुक्यातील १४८ शेतकऱ्यांचे २९ लाख २ हजार २८८ रुपये, पारशिवनी तालुक्यातील १०८ शेतकऱ्यांचे १८ लाख ६६ हजार २९४ रुपये, मौदा तालुक्यातील १०६ शेतकऱ्यांचे ९ लाख ३१ हजार ७९४ रुपये, काटोल तालुक्यातील ३०२ शेतकऱ्यांचे ३६ लाख ७८ हजार २०१ रुपये, नरखेड तालुक्यातील ३३६ शेतकऱ्यांचे ४८ लाख ३१ हजार ८९४ रुपये असे एकूण १७५६ शेतकऱ्यांनी घेतलेल्या २ कोटी ९२ लाख १९ हजार ४६८ रुपयांचे सावकारी कर्ज माफ करण्यात आले. (प्रतिनिधी)आतापर्यंत जिल्ह्यात ३४०१ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १९६ सावकारांकडून ३४०१ शेतकऱ्यांनी घेतलेल्या ५ कोटी ६९ लाख ४५ हजार ६० रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जदारांचे प्रकरण तालुकास्तरीय समितीने अद्याप पर्यंत निकाली काढले नाहीत. ती प्रकरणे येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बैठकीत केली. परवानाधारक सावकारांनी त्यांचे स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
१७५६ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त
By admin | Published: October 31, 2015 3:28 AM