शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

शाळाबाह्य १८० बालकांना शाेधण्यात यश

By निशांत वानखेडे | Published: May 04, 2024 5:13 PM

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभियान : शाळा प्रवेशाची प्रक्रिया निश्चित केली

नागपूर : जिल्ह्यात शाळाबाह्य मुले अत्यल्प आहेत, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यातील फाेलपणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष अभियानातून समाेर आला आहे. प्राधिकरणाच्या स्वयंसेवकाच्या विशेष पथकाने नागपूर जिल्ह्यात तब्बल १८० शाळाबाह्य मुलांचा शाेध घेण्यात यश मिळविले आहे. धक्कादायक म्हणजे त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.

नागपूर जिल्ह्यातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील यांनी तीन विधी स्वयंसेवकांचे पथक स्थापन केले आहे. यामध्ये विधी स्वयंसेवक मुकुंद अडेवार, मुशाहीद खान व राजरतन वानखेडे यांचे पथक जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांचा समावेश आहे. या पथकाने नागपूर शहर व ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टी, आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये शाेध घेतला. मोहिमेत शहरातील १०२ व ग्रामीण भागातील ७८ अशा एकूण १८० शाळाबाह्य बालकांचा शाेध घेऊन शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली. त्यामध्ये कधीही शाळेत न गेलेले ५५ आणि मध्येच शाळा सोडलेले १२५ मुला मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३ मुले व २ मुली अपंग आहेत.

मुलींचे प्रमाण लक्षणीयसर्वेक्षण करतेवेळी शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे मुकुंद अडेवार यांनी सांगितले. या मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देणेसाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गौतमनगर, गिट्टीगोदाम येथील दोन एकल पालक मुलींना शासनाच्या सावित्रीबाई फुले संगोपन योजनेची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधी स्वयंसेवक पथकाने मदत केली. तसेच मुलांकरीता असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजनांची देखील पालकांना माहीती देण्यात आली.

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी