लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १८६ रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत.उंदरावरावरील ‘चिगर माईट्स’ या जीवाणुमूळे होणारा स्क्रब टायफसचे रुग्ण आॅगस्ट महिन्यात अचानक आढळून आले. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हे प्रकरण उजेडात आणले. याची दखल प्रशासनाने घेतली. तातडीने उपाययोजनांना सुृरुवात झाली. परंतु त्यानंतरही आतापर्यंत या रुग्णांची संख्या नागपूर विभागात १८६ वर पोहचली. शहरात या आजाराचे आतापर्यंत ३८ रुग्ण व सहा बळी तर ग्रमीण भागात ५० रुग्ण व सात बळीची नोंद आहे. हा आजार नियंत्रणात कधी येईल, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
नागपुरात स्क्रब टायफसचे १८६ रुग्ण , २९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:19 AM
तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १८६ रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यात ८८ रुग्ण