शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपूर मार्गे धावणाऱ्या १९ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:25 PM

दिल्लीकडील भागात दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान, सोमवारी १९ रेल्वेगाड्यांना विलंब झाला. या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : वेटिंग रूम गर्दीमुळे फुल्ल

आॅनलाईन लोकमतनागपूर : दिल्लीकडील भागात दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान, सोमवारी १९ रेल्वेगाड्यांना विलंब झाला. या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.दिल्लीकडील भागात दाट धुके पडले आहे. धुक्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे बंद झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने या भागात रेल्वेगाड्या कॉशन आॅर्डरने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात रेल्वेगाडी क्रमांक १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १५ तास, १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस १४ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद तेलंगणा एक्स्प्रेस ११ तास, १६०३२ श्री माता वैष्णोदेवी-चेन्नई सेंट्रल अंदमान एक्स्प्रेस ७.२० वाजता, १२६१६ दिल्ली सराय रोहिला-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ११ तास, १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस ७ तास, ०७००६ रक्सोल-हैदराबाद एक्स्प्रेस १६ तास, १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेस ९ तास, १५१२० मंडूआदीह-रामेश्वरम एक्स्प्रेस २.३० तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगणा एक्स्प्रेस ५ तास, १२५१२ त्रिवेंद्रम-गोरखपुर राप्तीसागर एक्स्प्रेस ४.३० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ७ तास, १२२९६ दानापूर-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ४ तास, २२४०४ नवी दिल्ली-पुडुचेरी एक्स्प्रेस ७ तास, १२८५४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस २ तास, १७६०९ पटना-पूर्णा एक्स्प्रेस ४.३० तास, १२२६९ चेन्नई-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ६ तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेस ३ तास या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे दुसऱ्या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी मागण्यासाठी प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात गर्दी केली होती.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर