लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील विविध गावांमध्ये डेंग्यूच्या २० रुग्णांनी नाेंद करण्यात आली आहे. अनेक रुग्ण खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने त्यांची शासकीय रुग्णालयांमध्ये नाेंद नसल्याने, ही रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक असल्याची तसेच डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. तालुक्यात विषाणूजन्य तापाच्या रुग्णसंख्येही वाढ हाेताना दिसून येत आहे.
तालुक्यातील काेराेना संक्रमण कमी हाेते न हाेते ताेच डेंग्यूने ताेंड वर काढले आहे. ऐन पावसाळ्यात विषाणूजन्य तापाच्या रुग्णांसाेबत डेंग्यू व साध्या हिवतापाचे रुग्णही आढळून येत आहेत. मागील चार दिवसात तालुक्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २० वर पाेहाेचली आहे. या रुग्णांची नाेंद शासकीय दवाखान्यात आहे. बहुतांश रुग्ण नागपूर, माैदा व भंडारा येथील खासगी डाॅक्टरांकडे उपचार घेत असल्याने, त्यांच्या नाेंदी शासकीय दवाखान्यांमध्ये नाही.
आपल्याकडे डेंग्यू व विषाणूजन्य तापाचे राेज १८ ते २० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती माैदा शहरातील काही खासगी डाॅक्टरांनी दिली. त्यामुळे तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या बरीच माेठी असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले. तालुक्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिक प्रशासनाने मात्र अद्याप काहीही उपाययाेजना करायला सुरुवात केली नाही.
...
उपाययाेजना करणार कधी?
माैदा शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. आराेग्य विभागाने माैदा नगर पंचायत व संबंधित ग्रामपंचायतींना डास प्रतिबंधक उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, तालुक्यात स्थानिक प्रशासनाने अद्यापही डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी करणे, रिकाम्या जागेवरील पाण्याची डबकी साफ करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे यासह अन्य उपाययाेजनांना अद्यापही सुरुवात केली नाही. या उपाययाेजना कधी करणार, प्रशासन रुग्णांच्या मृत्यूची प्रतीक्षा करीत आहे काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
...
तालुक्यात सध्या डेंग्यूचे २० रुग्ण आढळून आले आहेत. बहुतांश रुग्ण खासगी लॅबमध्ये तपासणी करतात. खासगी लॅबचा रिपाेर्ट आम्हाला मान्य नाही. आम्ही नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटल व मेयाे रुग्णालयातील रिपाेर्टवर विश्वास ठेवताे. त्यामुळे रुग्णांनी सरकारी दवाखान्यांमधील लॅबमध्ये तपासणी करावी.
- डाॅ. रूपेश नारनवरे,
तालुका आराेग्य अधिकारी, माैदा.
...
याबाबत आराेग्य विभागाने माहिती दिली आहे. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींमधील सरपंच व ग्रामसेवकांना आपापल्या गावात डास प्रतिबंधक उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धूरळणी व सर्वेक्षण कार्य सुरू करण्यात आले आहे.
- दयाराम राठाेड,
खंडविकास अधिकारी, माैदा.