शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

नागपूर विभागात २० टक्केच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 9:18 PM

पंतप्रधान पीक विमा योजनेबाबात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने नाराजी आहे. पीक विमा खासगी कंपन्यांना पोसण्यासाठी सरकारने चालविलेला फार्स आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांचा आरोप योग्य असल्याचे दिसते आहे. नागपूर विभागात २,४४,३५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५४३३६ शेतकरीच लाभार्थी ठरले. २०१७-१८ मध्ये मोठ्या संख्येने वादळ, गारपीट, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव यामुळे नुकसान झाले. असे असतानाही २० टक्केच शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी ठरल्याने, शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

ठळक मुद्दे२,४४,३५७ शेतकऱ्यांनी काढला होता विमा : ५४३३६ शेतकरी ठरले लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेबाबात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने नाराजी आहे. पीक विमा खासगी कंपन्यांना पोसण्यासाठी सरकारने चालविलेला फार्स आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांचा आरोप योग्य असल्याचे दिसते आहे. नागपूर विभागात २,४४,३५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५४३३६ शेतकरीच लाभार्थी ठरले. २०१७-१८ मध्ये मोठ्या संख्येने वादळ, गारपीट, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव यामुळे नुकसान झाले. असे असतानाही २० टक्केच शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी ठरल्याने, शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.शेतकऱ्यांना शेती उत्पादनात स्थैर्य प्राप्त करून देता यावे आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करता यावा यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान आधारित पीक विमा योजना गुंडाळून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. योजनेमध्ये खासगी विमा कंपन्यांना भरपूर वाव देण्यात आला. मोठ्या प्रमाणावर प्रचार व जाहिराती करून तसेच बँकातून कर्ज घेणाºया शेतकऱ्यांना विम्याची सक्ती करण्यात आली. नागपूर विभागात सहाही जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये २,४४,३५७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला किंवा सक्तीने पीक विमा काढून घेतला. जवळपास २,५२,९७४.२१ हेक्टर जमिनीचा पीक विमा काढण्यात आला. यासाठी संरक्षित रक्कम ९९१.११ कोटी नोंदविण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे ६०.०९ कोटी जमा करण्यात आले. शासनाने २०१७-१८ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ला वर्धा, गोंदिया व गडचिरोलीचे काम दिले होते. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याचे काम भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबईकडे होते तर दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे ही कंपनी भंडारा जिल्ह्यासाठी नियुक्त केली होती. नुकसान नियमात बसतच नाहीकामठी तालुक्यातील वादळामुळे धानाचे नुकसान झाले होते. कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी शेतात पोहचले. पण हे नुकसान नियमात बसतच नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केली.विनोद पाटील, सदस्य, जि.प.

सर्वेक्षणही झाले बोगसनुकसानभरपाईचा झालेला सर्वे हा बोगस निघाला. अधिकारी शेतात पोहचलेच नाही. कार्यालयात बसून निव्वळ कागद रंगविण्यात आले. त्यामुळेच तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. हे शक्य आहे का?मनोहर कुंभारे, जि.प. सदस्य.

 विमा केवळ कंपन्यांचे हित जोपासण्यासाठीइन्शुरन्स कंपन्या, केमिकल कंपन्या ह्या राजकीय पक्षांना निवडणुकीत फंड देतात. त्यांचे हित जोपासण्यासाठी पीक विमा आहे. विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पॉलिसी दिली जात नाही. टर्म अ‍ॅण्ड कंडीशन शेतकऱ्यांना माहिती नसते. ग्रा.पं.मध्ये कंपनीचा एजंट नसतो. कुठल्या भरोशावर विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देणार आहे. अधिकारी सर्वेक्षणासाठी शेतात जात नाही. तर पीक विमा कसा मिळणार? सर्वंकष पीक विमा योजना असावी आणि ती पारदर्शक असावी. नुकसानीची भरपाई सरकारने घ्यावी. खासगी कंपन्यांना तर पीक विमा देऊच नये. नाहीतर शेतकरी निव्वळ फसविले जातील.अमिताभ पावडे, कृषीतज्ज्ञ

विमा योजनेचे जिल्हानिहाय लाभार्थी 

जिल्हा            शेतकरी संख्या                    विमा मिळालेले शेतकरी                           रक्कम (लाखात)

   
वर्धा                   ३२३३१                              २६०                                                     ११.४०   
नागपूर               ३६२१८                               १४४७                                                   १३६.२४   
भंडारा                ६८२७०                             १६९१५                                                  १०७८.४७   
गोंदिया              ४७५९१                               ६२६२                                                   १५८.८१   
चंद्रपूर               ४११६०                                २४७१८                                                 ४३५२.३७   
गडचिरोली          १८७८७                               ४७३४                                                  २७२.०८       
टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा