उमरेड : लसीकरणापूर्वीच रक्तदान करा, असे आवाहन सर्वत्र केले जात आहे. सद्यस्थितीत तसेच भविष्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, अनेक संस्था प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. येथील आशीर्वाद सभागृहात आयोजित शिबिरात २० जणांनी प्लाझ्मा दान तर ७० तरुणांनी रक्तदान केले.
उमरेड युथ फाऊंडेशन, शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ, इंडिया पॉवर जीम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उमरेड नगरच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजू पारवे, डॉ. हरिश वरभे, तालुका संघचालक अरविंद हजारे, जिल्हा प्रचारक लक्ष्मीकांत भोंगाडे, नगर कार्यवाह सचिन चट्टे, नगर सेवाप्रमुख मुकुल लुले, संस्थापक अनिल गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, माजी अध्यक्ष संजय मौदेकर, महेश ठाकरे, प्रशांत देवतळे, शैलेश ठाकरे, आदी उपस्थित होते. पायाला दुखापत झालेली असतानाही सचिन कुहीकर यांनी प्लाझ्मा दान केले. त्यांच्या या दायित्त्वाचे आणि धाडसाचे यावेळी कौतुक झाले. तसेच अमित, राकेश व जय मुलचंदानी या तीन भावंडांपैकी दाेघांनी प्लाझ्मा दान तर एकाने रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन स्वप्निल लाडेकर यांनी केले.
या उपक्रमाला रितेश राऊत, किशोर आदमने, सतीश चकोले, विजय जैस्वानी, राजू चाचरकर, मुकेश गौतम, प्रांजल डहाके, विशाल बावणे, शुभम सिर्सीकर, अक्षय खानोरकर, डॉ. अनुप शेंदरे, गौरव राहाटे, जय मुलचंदानी, स्वप्निल गवळी, आशिष वंजारी तसेच लाईफलाईन रक्तपेढीच्या चमूने सहकार्य केले.