नागपूर : कामठी येथील गाडर््स रेजिमेंट सेंटर येथून तब्बल ३४ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर २०० सैनिक आता देशाच्या रक्षणासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत. रेजिमेंट सेंटर येथे दीक्षांत समारंभात या रिक्रूटस्ना सशस्त्र सैनिकांचा दर्जा बहाल करण्यात आला. शनिवारी आयोजित दीक्षांत समारंभप्रसंगी या सैनिकांनी परेड केली. या सैनिकांना देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी खास प्रशिक्षित करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने रेजिमेंट दंंडपाल यांच्याकडून त्यांनी आपल्या कर्तव्याप्रति त्याग आणि बलिदानाची शपथ घेतली. या प्रशिक्षणादरम्यान सर्व क्षेत्रात टिपू ट्रेनिंग कंपनीचे रिक्रुट सोनू यांना सर्वश्रेष्ठ रिक्रूट ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड मुख्यालयाचे प्रिन्सिपल डायरेक्टर ब्रिगेडियर एम.के. मागो यांनी परेडचे अवलोकन केले.
देशासाठी लढण्यास २०० सशस्त्र सैनिक तयार
By admin | Published: July 11, 2016 2:48 AM