नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात उपस्थित लावली. त्यानंतर त्यांनी वक्त्यांना संबोधित केलं. मराठी माणूस देशाचा पंतप्रधान कधी होणार या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना छेडले असता ते म्हणाले, 2050पर्यंत देशाला एक नव्हे तर जास्त मराठी पंतप्रधान मिळतील. मराठीचा झेंडा अटकेपार लागण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी एक नव्हे तर अधिक माणसे आपण निश्चितच पाहू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.समाजात ज्या वेळेस परिणामकारक बदल करू शकू तेव्हा चांगला समाज घडेल. देशात बेघरांची संख्या मोठी असून, अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांच्या त्यात समावेश आहे. तुलनेने जे सगळ्यात खाली आहेत त्यामुळे त्यांचा विचार अधिक करावा लागतो. आर्थिक आरक्षण हा अतिरिक्त विषय असू शकतो. मात्र आजही मागासलेपण अधिक आहे. त्यामुळे जात आहे व तोपर्यंत दाखलाही आहे. म्हणून मला असं वाटतं की याकरिता अजून थोडी वाट पाहावी लागेल.
राजकारणात काम करत असताना समाजात काम करण्याची वृत्ती जागी झाली. त्यामुळेच हा जो हात आहे तो घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे. विरोधी पक्षात काम करत असताना संकल्पना मांडत असतो. परंतु सत्ता पक्षात गेल्यानंतर त्या संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र यंत्रणेकडून म्हणावी तशी गती मिळाली नाही. यंत्रणा साथ देत नव्हती. 2014च्या निवडणुकीतही मी एक व्हिजन डॉक्युमेंट केलं होतं. तसा एक कार्यक्रमदेखील मी केला होता. ते व्हिजन डॉक्युमेंट कसं सत्यात उतरवता येईल, याचाही मी विचार केलेला होता. त्यावेळेस मांडलेली गोष्ट पूर्ण केली आहे.