लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : पाेलिसांनी वडाेदा (ता. कामठी) शिवारात केलेल्या दाेन कारवायांमध्ये बांधून ठेवलेल्या २१ जनावरांची सुटका केली. या जनावरांची एकूण किंमत ११ लाख ७० हजार रुपये आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आराेपींचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मंगळवारी रात्री नागपूर-माैदा-भंडारा मार्गावरील वडाेदा शिवारात असलेल्या एका कंपनीच्या मागे काही जनावरे बांधली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पाेलिसांनी त्या भागाची पाहणी केली असता, तिथे १३ जनावरे बांधली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री याच शिवारातील पांदण रस्त्यालगत काही जनावरे बांधली असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी परत त्या भागाची पाहणी केली. त्यात त्यांना आठ जनावरे दाेरांनी बांधली असल्याचे आढळून आले.
ही सर्व जनावरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याची तसेच जनावरांवर त्यांची मालकी सांगणारी एकही व्यक्ती आढळून न आल्याने पाेलिसांनी तीही जनावरे ताब्यात घेतली. या सर्व जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली असून, या सर्व गुरांची एकूण किंमत १ लाख ७० हजार रुपये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दाेन्ही प्रकरणांमध्ये माैदा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अनुक्रमे पाेलीस नाईक जाधव व मनिराम भुरे करीत आहेत.