शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 8:32 PM

गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.

ठळक मुद्देमोठ्या प्रकल्पांमध्ये ३८.२३ टक्के साठा : असोलामेढा, दिना व पोथरा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये आजच्या तारखेत एकूण १३५८.७८ दलघमी (३८.२३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा या धरणातील पाणीसाठा क्षमत ५२.३३ दलघमी इतकी आहे. तो १०० टक्के भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दिना या प्रकल्पाची क्षमता ६७.५४ दलघमी आहे, तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणाची साठा क्षमता ३५ दलघमी इतकी आहे. हेही प्रकल्प १० टक्के भरले आहेत. यासोबतच नागपूर जिल्ह्यातील लोवर नांद वना प्रकल्प ९४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ८५ टक्के, कालीसरार ८३ टक्के भरले आहेत. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह केवळ २१.३२ टक्के, कामठी खैरी ३३.७१ टक्के, रामटेक ४४.०३ टक्के, वडगाव ६६.०४ टक्के, इटियाडोह ५८.२३ टक्के, सिरपूर ४४.६४ टक्के, बोर ३०.२७ टक्के, धाम ३४.१८ टक्के, लोवर वर्धा (टप्पा-१), २६.९७ टक्के, बावनथडी २९.१३ टक्के, धापेवाडा बॅरेज (टप्पा-२)२५.२९ आणि गोसेखुर्द धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी इतकी असून त्यात २४८.३४ दलघमी (३३.५५ टक्के) इतके भरले आहे. मोठ्या प्रकल्पातील बहुतांश प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे.मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात पाऊस चांगला झाल. तसेच गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. त्यामुळे पाण्याचा जोर वाढला की, खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. सोमवारी आलेल्या पावसामुळेही गोसेखुर्दचे सर्वचे सर्व ३३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर