शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

नफ्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याचे २१ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:59 PM

Fraud अल्पावधीत लाखोंच्या नफ्याचे आमिष दाखवून दोन आरोपींनी महेश प्रभुदयाल अग्रवाल या गांधीबाग मधील व्यापाऱ्याला २१ लाखांचा गंडा घातला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अल्पावधीत लाखोंच्या नफ्याचे आमिष दाखवून दोन आरोपींनी महेश प्रभुदयाल अग्रवाल या गांधीबाग मधील व्यापाऱ्याला २१ लाखांचा गंडा घातला. सुयेक देवतळे आणि शैलेश भारद्वाज अशी आरोपींची नावे आहेत. देवतळे श्रीकृष्णनगरात तर भारद्वाज, वर्मा ले-आऊट अंबाझरी येथे राहतो.

या दोघांनी पारिन कंपनीत रक्कम गुंतवायला लावून तसेच कंपनीचे रॉ -मटेरियल विकत घेण्यास भाग पाडून अग्रवाल यांच्याकडून २० लाख ८७ हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात ठरल्याप्रमाणे अग्रवाल यांना एकही रुपयाचा मुनाफा दिला नाही. उलट त्यांनी विकत घेतलेला माल परस्पर दुसऱ्यांना विकून अग्रवाल यांची फसवणूक केली. मंगळवारी दुपारी अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी देवतळे आणि भारद्वाज यांची चौकशी केली जात आहे.

 

डिमांड काढून देण्याच्या नावाखाली प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

 प्लॉटची डिमांड आणि टॅक्स काढून देतो, अशी थाप मारून एका आरोपीने महिलेचा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केला. पंकज वैद्य असे आरोपीचे नाव असून, तो रामबाग परिसरात राहतो.

शीलगंधा सोपानराव पाटील (वय ६०) या चंदननगरमध्ये राहतात. आरोपी पंकजसोबत त्यांची ओळख आहे. शीलगंधा यांच्या वडिलांनी मानेवाड्यात एक प्लॉट घेऊन ठेवला आहे. त्याचा टॅक्स आणि डिमांड काढून देतो, अशी थाप मारून आरोपी पंकजने शीलगंधा यांच्याकडून प्लॉटची मूळ कागदपत्रे घेतली. त्यांना अंधारात ठेवून शीलगंधा यांच्या आईच्या ॲग्रिमेंटवर सह्या घेतल्या आणि वडिलांच्या बनावट सह्या करून तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केला. २००८ ते २०१८ दरम्यान पंकज वैद्य याने ही बनवाबनवी केली. ती लक्षात आल्यानंतर शीलगंधा पाटील यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी