शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

२१ टक्के कंपन्यांचेच कामकाज ‘स्टार्ट’

By admin | Published: January 10, 2015 2:38 AM

गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या ‘मिहान’ प्रकल्पात गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी याकरिता अद्यापही फारसे पोषक वातावरण निर्माण झालेले नाही.

नागपूर : गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या ‘मिहान’ प्रकल्पात गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी याकरिता अद्यापही फारसे पोषक वातावरण निर्माण झालेले नाही. येथील ‘सेझ‘मध्ये (स्पेशल इकॉनॉमिक झोन) ५५ कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात यातील केवळ २१ टक्केच म्हणजे १२ कंपन्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. गुंतवणूकदार कंपन्यांच्या उभारणीचा हा वेग राहिला तर ‘मिहान’च्या माध्यमातून विकासाची झेप घेण्यासाठी नागपूरला आणखी अनेक वर्षे लागू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘मिहान’मध्ये नेमक्या किती कंपन्यांचे काम सुरू झाले आहे व इतर कंपन्यांची नेमकी काय स्थिती आहे यासंदर्भात ‘एमएडीसी’कडे (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपेन्ट कंपनी) विचारणा केली होती. यावर ‘एमएडीसी’चे जनमाहिती अधिकारी सी.जे.बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ‘सेझ’मध्ये गुंतवणूक केलेल्यांपैकी केवळ १२ कंपन्यांनीच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे. तर १० कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. ‘मिहान’मध्ये ‘सेझ’च्या बाहेर १४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यातील प्रत्यक्षात तीनच समूहांकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सात कंपन्यांकडून प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. तर देशातील आणखी १० कंपन्यांनी ‘मिहान’मध्ये ‘युनिट’ सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. (प्रतिनिधी)