शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नागपूर शहरातील २१० नाले झाले स्वच्छ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:33 IST

पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या नाल्यातील पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका असतो. याचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे शहरातील २२७ नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यातील २१० नाल्यांतील गाळ, कचरा व वाढलेली झुडपे काढण्यात आली. उर्वरित १७ नाल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या नाल्यातील पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका असतो. याचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे शहरातील २२७ नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यातील २१० नाल्यांतील गाळ, कचरा व वाढलेली झुडपे काढण्यात आली. उर्वरित १७ नाल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.शहरात एकूण २२७ नाले असून गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ४८ नाले असून सर्वांत कमी १३ नाले हनुमाननगर झोनमध्ये आहेत. नदी स्वच्छता अभियानासोबतच नाले स्वच्छता अभियानही सुरू करण्यात आले होते. नाले हे वस्त्यांना लागून असल्याने पावसाळ्यात वस्त्यात पाणी शिरण्याची भीती अधिक असते. शिवाय नाल्यांचे पात्र अरुंद असल्याने तासाभराच्या पावसातही ते तुडुंब भरून वाहतात. जोराचा पाऊस झाल्यास अनेक वस्त्यांमध्ये तर नाल्यांमधील पाणी शिरते. यामुळे पुरासारखी परिस्थिती असते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यानुसार नाले सफाई १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून नाले सफाई करण्यात आली.जे नाले अरुंद आहेत अशा नाल्यांची स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मोठ्या नाल्यात छोटे पोकलेन उतरवून स्वच्छता करण्यात आली. पावसाळ्यात नाल्यांतील पाणी शहरातील तीनही नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांसोबतच नाल्यांची स्वच्छता तितकीच महत्त्वाची ठरते. तीन वर्षांपूर्वी शहरातील नाल्यात वाहून गेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नाले सफाई व खोलीकरण करणे गरजेचे असते.१० जूनपर्यंत सर्व नाल्यांची स्वच्छतापावसाळ्यात नाल्याकाठावरील वस्त्यात पाणी शिरू नये यासाठी शहरातील २२७ नाल्यांची महिनाभरापूर्वी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. ८ जूनपर्यंत २१० नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. उर्वरित १७ नाल्यांचे काम सुरू असून १० जूनपर्यंत पूर्ण होईल.डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, मनपाझोननिहाय नाल्यांची संख्यालक्ष्मीनगर -२२धरमपेठ -३४हनुमाननगर- १३धंतोली -१६नेहरूनगर- १५गांधीबाग -४८सतरंजीपुरा- २०लकडगंज -१४आसीनगर -१५मंगळवारी -२९.................एकूण -२२७कमीत कमी खर्चात नाले सफाईमागील वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी खर्चात अभियान पूर्णत्वाकडे आहे. २२७ पैकी २१० नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. यंदा केवळ ४३ लाख ७९ हजार २८० रुपये एवढा निधी नाले सफाईकरिता प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत हा निधी केवळ ४३ टक्के आहे. मागील वर्षी नाले सफाईकरिता १ कोटी ३३ लाख ३० हजार ३६० रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी १ कोटी २ लाख ९५ हजार ६१८ रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNaag Riverनाग नदी