शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

विदर्भात कोरोनाचे २१,४७७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 10:02 PM

Active Corona Positive in Vidarbha विदर्भात कोरोनाबाधितांसोबतच मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गुरुवारी १५३० रुग्ण तर ३८ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,६२,४११ झाली असून मृतांची संख्या ४४०२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१,५३० नवे रुग्ण तर ३८ मृत्यूची भर : रुग्णसंख्या १,६२,४११, मृतांची संख्या ४४०२

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांसोबतच मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गुरुवारी १५३० रुग्ण तर ३८ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,६२,४११ झाली असून मृतांची संख्या ४४०२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १,३६,५०७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत २१,४७७ रुग्ण ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहेत.नागपूर जिल्ह्यात आज ७४६ रुग्णांचे निदान तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ८४,८२७ झाली असून २,७२४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या जिल्ह्यात ७२,६१४ रुग्ण बरे झाले, तर ९,४८९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह म्हणजे क्रियाशील आहेत. अमरावती जिल्ह्यात १५१ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची संख्या १४,५२४ झाली असून मृतांची संख्या ३२४ वर गेली आहे. १२,३३८ रुग्ण बरे झाले आहेत. ६८२ रुग्ण उपचार घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात १५१ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ११,६२३ झाली आहे तर मृतांची संख्या १८०वर पोहचली आहे. ८,३६९ रुग्ण बरे झाले असून ३,०७४ रुग्ण उपचार घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ११३ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ३,६१८ झाली. जिल्ह्यात २१ मृत्यू, २६७६ कोरोनामुक्त व ९२१ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. भंडारा जिल्ह्यात १०७ रुग्ण व तीन रुग्णांचे बळी गेले. ४,८३३ रुग्ण बरे झाले आहेत तर १,४९८उपचाराखाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ५२ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ८,९२९ वर गेली आहे. जिल्ह्यात ७९६३ रुग्ण बरे झाले. ७८९ रुग्ण क्रियाशील आहेत. वाशिम जिल्ह्यात २१ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. ४,१०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ६६१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ४३ रुग्ण व दोन बळी गेले. ७०५९ रुग्ण बरे झाले आहेत. ७५१ रुग्ण उपचार घेत आहेत. वर्धा जिल्ह्यात ७२ रुग्णांचे निदान व पाच मृत्यू झाले. जिल्ह्यात ३,०८४ रुग्ण बरे झाले असून १९८८ रुग्ण क्रियाशील आहेत. अकोला जिल्ह्यात ३६ पॉझिटिव्ह रुग्णांची व एका मृत्यूची नोंद झाली. ६,६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ७९७ रुग्ण उपचार घेत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३८ बाधित रुग्ण आढळून आले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६७६ झाली आहे. ९२१ अ‍ॅक्टिव्ह आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याVidarbhaविदर्भ