नागपूर : ‘कोरोना’च्या सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून मागील २४ तासांत १० रुग्ण बरे झाले. तर नवे तीन बाधित आढळले. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी चाचण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली दिसून आली.
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार २४ तासांत २ हजार ६९७ चाचण्या झाल्या. त्यातील १ हजार ८७९ चाचण्या शहरात तर ८१८ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९३,४८० झाली असून मृतांची संख्या १०,१२१वर स्थिर आहे.
शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,४०,३९१ वर पोहोचली असून ग्रामीणमधील रुग्णांची संख्या १,४६,१९९ वर कायम आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८३,३३७ झाली आहे. सध्या शहरातील १९, ग्रामीणमधील तीन रुग्ण सक्रिय आहेत.
: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या : २६९७
शहर : तीन रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण : ४,९३,४८०
एकूण सक्रिय रुग्ण : २२
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८३,३३७
एकूण मृत्यू : १०,१२१