लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकूण पेट्रोल पंपांपैकी २२.५ टक्के अर्थात विदर्भातील २६७ पंप एससी व एसटी व्यावसायिकांसाठी राखीव आहेत. वितरण कंपन्यांतर्फे निर्धारित केलेल्या ठिकाणी मालकीच्या जागा असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्या स्थळी लिजवर जागा घेऊन अर्ज करणे शक्य असल्याचे प्रतिपादन बीपीसीएलचे टेरिटोरी व्यवस्थापक समीर डांगे यांनी केले.डिक्की विदर्भ चॅप्टर आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) वतीने पेट्रोल पंप डीलर निवड पद्धतीवर वर्धा रोड येथील बानाई हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक, बीपीसीएलचे टेरिटोरी समन्वयक नीलेश लेले, डिक्की विदर्भचे उपाध्यक्ष रुपराज गौरी, व्हर्टिकल हेड प्रदीप मेश्राम, मंगेश डोंगरवार, लेडीज विंगच्या अध्यक्षा विनी मेश्राम उपस्थित होते.समीर डांगे यांनी पेट्रोल पंप वितरणाची कार्यपद्धती आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तरुणांना माहिती दिली.निश्चय शेळके म्हणाले, एससी व एसटी उद्योजक तरुणांसाठी पेट्रोल पंप क्षेत्रात प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे. याचा तरुणांनी लाभ घ्यावा. गोपाल वासनिक यांनी कार्यशाळा आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, पेट्रोल पंपकरिता राखीव कोटा असूनही एससी व एसटी तरुण माहितीच्या अभावामुळे या क्षेत्रात येत नव्हते. एससी व एसटी उद्योजक तरुणांनी या क्षेत्रात यावे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संचालन प्रदीप मेश्राम यांनी तर रुपराज गौरी यांनी आभार मानले.
एससी व एसटी तरुणांसाठी २२.५ टक्के पेट्रोल पंप राखीव: समीर डांगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:06 PM
एकूण पेट्रोल पंपांपैकी २२.५ टक्के अर्थात विदर्भातील २६७ पंप एससी व एसटी व्यावसायिकांसाठी राखीव आहेत. वितरण कंपन्यांतर्फे निर्धारित केलेल्या ठिकाणी मालकीच्या जागा असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्या स्थळी लिजवर जागा घेऊन अर्ज करणे शक्य असल्याचे प्रतिपादन बीपीसीएलचे टेरिटोरी व्यवस्थापक समीर डांगे यांनी केले.
ठळक मुद्दे डिक्कीतर्फे कार्यशाळा