लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दूषित पाणी व खाद्यपदार्थांमुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. एप्रिल ते आतापर्यंत २२९ रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर वाढत्या तापमानाचा फटका २२४ रुग्णांना बसला आहे. या रुग्णांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळून आली होती.महानगरपालिकेचा आरोग्य विभागाचे आयसोलेशन हॉस्पिटलचा बाह्यरुग्ण विभागात रोज ८० ते ९० रुग्ण उपचारासाठी येतात. यातील गंभीर रुग्णांना दाखल करून उपचार केला जातो. आतापर्यंत अशा रुग्णांची संख्या २२९वर गेली आहे. उष्माघाताची लक्षणे दिसून आलेल्या २१९ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले . सध्या पाच रुग्ण उपचार घेत असून रुग्णांची संख्या २२४ वर पोहचली आहे. मनपाचे आरोग्य विभाग (मेडिसीन) या दोन्ही आजारावर लक्ष ठेवून आहे. आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार दर दिवसाच्या रुग्णांचा आढावा घेत असून उपाययोजनांवर भर देत असल्याची माहिती आहे.
नागपुरात गॅस्ट्रोचे २२९ तर उष्माघाताचे २२४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:48 AM