लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०,७८४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ३७ लाख ५१ हजाराचा दंड वसूल केला आहे.गुरुवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४२, धरमपेठ ४५, हनुमाननगर २९, धंतोली १४, नेहरुनगर १२, गांधीबाग १६, सतरंजीपूरा १८, लकडगंज १२, आशीनगर २३, मंगळवारी २० आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत ५,३१४ बेजबाबदार नागरिकांकडून २६ लाख ५७ हजार दंड वसूल करण्यात आला.नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्कशिवाय फिरणाºया बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. .आतापर्यंत झोननिहाय दंड आकारलेल्यांची संख्यालक्ष्मीनगर १,५१८धरमपेठ १,९६७हनुमाननगर १,००६धंतोली १,०१८नेहरूनगर ६०१गांधीबाग ७०४सतरंजीपुरा ७३९लकडगंज ६४२आशीनगर ११६३मंगळवारी १३३३मनपा मुख्यालय ९३
नागपुरात मास्क न लावणाऱ्या २३७ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 9:51 PM
Not wearing mask action, Corona Virusमहापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
ठळक मुद्देआतापर्यंत १०,७८४ व्यक्तींविरुद्ध कारवाई