२४ वर्षीय महिलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची दिली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 08:32 PM2021-12-07T20:32:13+5:302021-12-07T20:33:03+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय मंडळाचा अहवाल लक्षात घेता वर्धा जिल्ह्यातील २४ वर्षीय महिलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी दिली. त्यामुळे महिलेला दिलासा मिळाला.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय मंडळाचा अहवाल लक्षात घेता वर्धा जिल्ह्यातील २४ वर्षीय महिलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी दिली. त्यामुळे महिलेला दिलासा मिळाला.
संबंधित महिला बोरगाव मेघे येथील रहिवासी आहे. तिच्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला. गर्भाला विविध शारीरिक विकृती आहेत. या बाळाच्या जन्मामुळे महिलेचे प्राण धोक्यात येतील, तसेच तिच्यावर शारीरिक-मानसिक आघात होईल, असा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला. परिणामी, महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली.