लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची तसेच मृतांची संख्या सतत वाढत आहे. याचा विचार करता संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे. पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २४१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७,०८५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १९ लाख १ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना मनपा व्दारे वारंवार केल्या जात आहे. यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यांना २०० दंड होता. परंतु वाढता संसर्ग लक्षात घेता १५ सप्टेंबरपासून ५०० रुपये दंड आकारला जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्कशिवाय फिरत आहेत.झोननिहाय कारवाईलक्ष्मीनगर - ३४धरमपेठ - ३१हनुमाननगर - २७धंतोली -१४नेहरुनगर - १०गांधीबाग -१४सतरंजीपुरा -२२लकडगंज - १२आशीनगर - २५मंगळवारी - ५१मनपा मुख्यालय - १
नागपुरात मास्क न लावणाऱ्या २४१ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:54 PM
नागपुरात कोरोना रुग्णांची तसेच मृतांची संख्या सतत वाढत आहे. याचा विचार करता संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे. पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २४१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
ठळक मुद्देमागील सात दिवसात १,६१५ विरुद्ध कारवाई