लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बर्ड फ्लूच्या खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने संसर्ग असलेल्या राज्यातील कोंबड्यांवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातदेखील बर्ड फ्लूचे नमुने आढळले असताना कळमेश्वर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्मवर २५० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून या कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही काही ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील बाजारातील झाडांखाली कावळे मृतावस्थेत सापडली. तर कोंढाळी भागातील रिंगणाबोडी, मिनीवाडा, मसाळा, चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपट, चिमण्या, कावळे, जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठ्या संख्येने अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले. रिंगणाबोडी येथे झाडाखाली मृत पोपटांचा सडा पडलेला आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पक्ष्यांचा मृत्यू कशाने झाला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील २५० वर कोंबड्या मृत आढळल्या. कोंबड्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने बर्ड फ्लूची शक्यता नसल्याचा अंदाज विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
यासंदर्भात कळमेश्वर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. हेमंत माळोदे म्हणाले, उबगी येथे नासेर अली यांच्या पोल्ट्री फॉर्मवर ज्या कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते नमुने आल्यानंतर कोंबड्यांच्या मृत्यूचा नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.
संसर्ग असलेल्या राज्यातील कोंबड्यांवर बंदी
यासंदर्भात कळमेश्वर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. हेमंत माळोदे म्हणाले, उबगी येथे नासेर अली यांच्या पोल्ट्री फॉर्मवर ज्या कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते नमुने आल्यानंतर कोंबड्यांच्या मृत्यूचा नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.