शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

दीक्षाभूमीच्या विकासासाठी २५० कोटींचा आराखडा

By admin | Published: March 14, 2016 3:09 AM

नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी २५० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस : उत्तर नागपुरात ४० कोटींचे सिमेंट रस्ते, सिकलसेल सेंटरसाठी ७ एकर जागानागपूर : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी २५० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. जगातील विविध देशातून नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना प्रथम दीक्षाभूमीला भेट देण्याची इच्छा व्हावी अशा आकर्षक दृष्टीने विकास करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.उत्तर नागपुरात ४० कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर सिंधी हिंदी शाळेच्या मैदानात आयोजित समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी तर अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके हे होते. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, मनपाचे सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबतच्या धोरणात काही सुधारणा करण्यात येईल. त्यांना घरबांधणीसाठी शासनातर्फे अनुदानही देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सिकलसेलग्रस्तांवर उपचार व संशोधन करण्यासाठी उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय संशोधन केंद्राला लागून असलेली सात एकर जागा सिकलसेल युनिट सेंटर आॅफ एक्सलन्ससाठी देण्यात येत आहे. हे केंद्र कसे असावे याचा प्रारूप आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधिताना दिले. उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. संचालन नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केले.(प्रतिनिधी)