लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसचा २०० जागांना मंजुरी प्राप्त आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीनुसार संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी नागपूर मेडिकलने वाढीव ५० जागांचा प्रस्ताव पाठविला आहे. यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी ३० जागा असणार आहेत.मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या नवीन निकषानुसार राज्यात पीजीच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साधारण ८०० जागा प्रस्तावित आहेत. यातील २०० जागा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी असणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव त्या-त्या महाविद्यालयाने आपल्या निकषानुसार ‘एमसीआय’कडे तर आर्थिक दुर्बल घटकाचा वाढीव जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला आहे. मुंबई येथील सूत्रानुसार, याच धर्तीवर एमबीबीएसच्या जागा वाढविण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आला. त्यानुसार नागपूर मेडिकलने शनिवारी तातडीने खुल्या प्रवर्गासाठी एमबीबीएसच्या २० तर आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी ३० जागा असे एकूण ५० जागा वाढविण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला आहे. याला मंजुरी मिळाल्यास येत्या शैक्षणिक सत्रात २५० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होणार आहे. अशीच काहीशी मिळतीजुळती स्थिती राज्यातील इतरही महाविद्यालयांची असणार आहे.
मेडिकल एमबीबीएसच्या २५० जागा होणार! प्रस्ताव पाठविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:13 PM
शासकीय वद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसचा २०० जागांना मंजुरी प्राप्त आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीनुसार संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी नागपूर मेडिकलने वाढीव ५० जागांचा प्रस्ताव पाठविला आहे. यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी ३० जागा असणार आहेत.
ठळक मुद्दे५० जागा वाढण्याची शक्यता