सिंदेवाही : शीतपेय विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांत शीतपेय व पाणी योग्यप्रकारे मिळत आहे की नाही, याकरिता आता अन्न व औषध प्रशासन विभाग वॉच ठेवणार आहे. त्याठिकाणी जर दूषित पाणी आढळल्यास संबधित विक्रेत्यांवर २५ हजारांचा दंड अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे. ही मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शीतपेय विक्रेत्यांनी आता पाण्याबद्दल शुद्धतेची हमी देण्याची गरज आहे. तापत्या वातावरणात तहान भागविण्यासाठी नागरिक शीतपेयांकडे धाव घेतात. त्यामुळे शीतपेय विक्रेत्यांची चांदी आहे. शहरात परवानाधारक व खुल्या जागेत शीतपेयांची विक्री करणाºयांची संख्या पाचशेच्या जवळपास आहे. प्रत्येक विक्रेता ग्राहकांसाठी योग्य पाण्याचा वापर करीत आहे किंवा नाही याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे विभाग परवानाधारक व खुल्या जागेत शीतपेयांची विक्री करणाºयांची तपासणी करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. सर्वाधिक आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (शहर प्रतिनिधी)
दूषित पाणी आढळल्यास २५ हजारांचा दंड
By admin | Published: May 05, 2014 12:34 AM