लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुका विधी सेवा समितीच्यावतीने न्यायालय सभागृहात आयोजित महालोक अदालतीमध्ये कळमेश्वर पंचायत समिती अंतर्गत ५० ग्रामपंचायतींच्या घर व पाणी कर वसुलीची १०५६ प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. यापैकी २५६ प्रकरणे निकाली काढून ८ लाख १५ हजार ९९७ रुपयांची करवसुली करण्यात आली. ही सर्व प्रकरणे न्यायाधीश होशंगाबादे यांच्या पॅनल समक्ष ठेवण्यात आली होती.
या लाेकअदालतीला खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, विस्तार अधिकारी यशवंत लिखारे, ग्रामपंचायत सचिव ओंकार तागडे, लक्ष्मीकांत डांगोरे, नरेश चोखांद्रे, सुनील भोयर, विक्रांत आखाडे, सागर ढवळे, नितीन कापसे, हितेंद्र फुले, प्रकाश धोटे, सरला चिमोटे, अश्विनी बर्गे, प्रणिता गणोरकर, भैया उके, सुषमा जाधव, विनया गायकवाड, मनिषा राठोड, पी. पी. सिंगनजुडे, दिनेश सहारे, लुकेश राणे आदींनी सहकार्य केले.