नागपूर : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेले वर्षभर अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ मे हा खऱ्या परीक्षेचा दिवस ठरणार आहे. अगदी एका-एका गुणासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागणार आहे. २0१३-१५ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेली 'एमएच-सीईटी' ही प्रवेशपरीक्षा ८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. अर्ज केलेले विद्यार्थी अन् उपलब्ध जागांची संख्या यांचे गुणोत्तर काढले असता एका जागेसाठी जवळपास २६ विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातून ६ हजार ५६१ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५ हजार ७१0 जागा उपलब्ध आहेत. संपूर्ण राज्यातून १ लाख ५३ हजार २२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विदर्भातून १४ हजार ३00 विद्यार्थी 'एमएच-सीईटी' परीक्षेत सहभागी होणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातीलच ६ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांची संख्या रोडावलीयंदा राज्यभरात एका जागेसाठी चक्क २६ परीक्षार्थी शर्यतीत असले तरी यंदा विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. २0१२ साली झालेल्या 'सीईटी'त २0 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. तर २0११ साली हीच संख्या २0 हजार इतकी होती. 'सीबीएसई'कडून घेण्यात येणार्या 'नीट' (नॅशनल एलिजिबिलीटी जॉईन्ट एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षेवर बंदी टाकल्यानंतर 'एमएच-सीईटी' देणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असा अंदाज होता.(प्रतिनिधी)
एका जागेसाठी २६ परीक्षार्थी
By admin | Published: May 07, 2014 1:59 PM