शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

 एलटीटी मुंबई-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढल्या

By नरेश डोंगरे | Published: December 21, 2023 7:51 PM

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 

नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेषची मुदत २६ डिसेंबरला संपुष्टात येणार होती. मात्र, या गाडीत प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने आता या गाडीच्या १३ फेऱ्या वाढविल्या. त्यामुळे ही गाडी आता २६ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०११२८ बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष २७ डिसेंबर २०२३ पर्यंत धावणार असे अधिसूचित करण्यात आले होते. मात्र, या गाडीच्यासुद्धा १३ फेऱ्या वाढवण्यात आल्याने ही गाडी आता २७ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांमध्ये ६ वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन तसेच ४ सामान्य द्वितीय श्रेणी असे एकूण २१ डबे राहणार आहे. गाडी पूर्वीच्या वेळेलाच सुटणार आहे. थांब्यामध्येही कसलाही बदल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे