लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे करवसुली ठप्प असल्याने याचा जबर फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसणार आहे. याचा विचार करतात प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील आर्थिक वर्षात मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २६० कोटींची वाढ अपेक्षित आहे. या वसुलीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.पाणीपट्टी शुल्कात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. सभागृहाच्या निर्णयानुसार दरवर्षी वाढ केली जाते. गॅलरी तमाशा पाणीपट्टीतून १५० कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले. पुढील आर्थिक वर्षात यात ११० कोटींची वाढ अपेक्षित आहे.नागपूर शहराला लोकसंख्येनुसार पाण्याचा निरंतर व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी २४ बाय ७ ही योजना राबविली जात आहे. या योजनेत शहरातील ३०टक्के भाग अंतर्भूत झाला आहे. नागपूर शहराला दरम्यान ६४० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यात जवळपास ४५ टक्के पाणी गळतीचे प्रमाण आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली गळती कमी करून ती पुढील वर्षात २५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे लक्ष ठेवले आहे. गांधीबाग, आसीनगर व सतरंजीपुरा झोनमधील जुनी वितरण व्यवस्था बदलणे आवश्यक असून यावर ३४६ कोटी खर्च अपेक्षित आहे.
- उत्पन्न वाढीसाठी ठळक उपाययोजना
- पाणी गळतीचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आणणे.
- शहरात ६६० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकणे.
- पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी टेलिस्कोपिक रेट आकारणे.
- थकबाकी वसुलीकडे अधिक लक्ष केंद्रित करणे.