शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

औषधांवर ३ कोटी तर विजेवर ४ कोटींचा खर्च

By सुमेध वाघमार | Updated: April 26, 2024 18:49 IST

मेयोतील वास्तव : सौर उर्जेतून उजळणार एक-एक इमारत

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वर्षाला औषधी, सर्जिकलसह इतरही साहित्यांवर ३ कोटींवर खर्च होत असताना त्यापेक्षा अधिक, ४ कोटी १० लाख रुपये विजेवर खर्च होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी यावर सौर उर्ज़ेचा पर्याय निवडला. पहिल्या टप्प्यात दोन इमारतीवर २०० किलोव्हॅट क्षमतेचे सौर पॅनल कार्यान्वित करण्याचे कार्य हाती घेतले. परिणामी, मे महिन्यापासून १ कोटी रुपयांची कपात करणे शक्य होणार आहे.

      गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेयोलाही वीजबिलाचे चटके सहन करावे लागत आहे. दरमहा जवळपास ३५ लाख रुपये विजेवर खर्च होत आहे. एकीकडे नवे बांधकाम, नवे विभाग व नवे यंत्र उपलब्ध होत असल्याने विजेच्या मागणी वाढली. त्यावरील खर्च वाढून ४ कोटी १० लाखांवर गेला. औषधांंवरील खर्चांपेक्षा विजेवरील खर्च मोठा आहे. परंतु आतापर्यंत याकडे कोणीच लक्ष दिले नाही. डॉ. चव्हाण यांच्याकडे अधिष्ठातापदाची सुत्रे येताच त्यांनी विजेवरील खर्च कमी करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (मेडा) सहकार्याने मेयोधमील बहुउद्देशिय इमारतीवर व न्यू गर्ल्स हॉस्टेलवरही सोलर प्लांट उभे करण्याला सुरुवात झाली. मे महिन्यात हा प्लांट पूर्ण झाल्यास जवळपास वर्षाला विजेचवरील खर्चात १ कोटींची बचत होणार आहे. 

-आणखी पाच ठिकाणी सौर पॅनलमेयो प्रशासन पुढील टप्प्यात सर्जिकल कॉम्प्लेक्स, नव्याने प्रस्तावित २०० बेड क्षमतेचे अतिदक्षता युनिट, विस्तारित बाह्यरुग्ण विभागाची इमारत, मुलांचे वसतीगृह, नव्याने उभारलेली प्रशासकीय इमारत या पाच ठिकाणी सौर उर्जा पॅनलची उभारणी करणार आहे. मेडाच्या मदतीने हे अपारंपारिक उर्जा स्त्रोत उभारले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच सौर उर्जेतून एक-एक इमारत उजळून निघणार आहे. 

-बचत होणाºया निधीतून औषधींची खरेदीवर्षाला विजेवर  ४ कोटी १० लाखांवर जात असल्याने सौर उर्जेचा पर्याय निवडला. मेयोतील एक-एक इमारतीवर ‘मेडा’ सहकार्याने सौर पॅनल उभे केले जातील. पहिल्या टप्प्यात बहुउद्देशिय इमारतीवर व न्यू गर्ल्स हॉस्टेलवरही सोलर उभे केले जात आहेत. त्यामुळे विजेवरील खर्चातून जवळपास १ कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. या निधीतून औषधांची खरेदी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. -डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयelectricityवीजnagpurनागपूर