लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधो पथकाने मुंबईतून नागपुरात आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. या ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोन तस्करांना अटक केली.मुंबईतून नागपुरात नियमित शुगरची तस्करी होते. सोमवारीदेखील दोघे जण ३० लाखांची ब्राऊन शुगर घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना ही माहिती कळविल्यानंतर सोमवारी सायंकाळी कळमना-कामठी रोडवरील स्वामी विवेकानंदनगरात सापळा रचण्यात आला. त्याचवेळी एक महिला आणि युवक हातात बॅग घेऊन गल्लीतून जात होते. पोलिसांना दिसताच त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. रेवन सीताराम ढोबळे (वय २६, तेलीपुरा, शांतिनगर) आणि चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर (वय ५५, रा. इतवारी रेल्वे स्टेशनजवळ), अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ५६१ ग्रॅम ब्राऊन शुगर आणि ४९० ग्रॅम दुसरा अमली पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत ३० लाख रुपये आहे.सर्वात मोठी कारवाईनागपूर पोलिसांनी अमली पदार्थ जप्तीची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरावी. दोन आठवड्यांपूर्वी याच पथकाने २५ लाखांचे गर्द जप्त केले होते. आता ३० लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केल्याने ड्रग्स तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपुरात ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:44 AM
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधो पथकाने मुंबईतून नागपुरात आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. या ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोन तस्करांना अटक केली.
ठळक मुद्देमहिलेसह दोघांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई